Russian tourist visited Jejuri Khandoba Temple

रशियात खंडोबाचा येळकोट ; जागतिक शांतता करिता रशियन महिलांची जेजुरी खंडोबा देवास प्रार्थना

जागतिक शांतता करिता रशियन महिलांची जेजुरी खंडोबा देवास प्रार्थना ,रशियात होत असतो खंडोबाचा येळकोट ,भारत देशाचे घडतायत आध्यत्मिक सांस्कृतिक संबध , जेजुरी – भारतीय लोकदैवत जेजुरीचा खंडोबा देव हे गाजते वाजते दैवत असून केवळ देशातच नव्हे तर विदेशात हि लोकप्रिय होऊ लागलेला जेजुरीचा सांस्कृतिक चेहरा विदेशी पर्यटकांना चांगलीच भुरळ घालत असून अनेक विदेशातून पर्यटक येत असतात आणि भंडारा उधळून आनंद घेताना दिसून येत असतात नुकताच रशिया सारख्या देशातून चार महिला पर्यटक भाविक जेजुरी गडावर आल्या आणि त्यांनी खंडोबा देवास जागतिक शांतते करिता या मल्हारी मार्तंड देवास साकडे घातले या पूर्वीही अनेक रशियन फ्रास्न्स इंग्लंड अमेरिका जपान सारख्या देशातून पर्यटक भाविक येत असतात आणि भंडार्याची उधळण खंडोबा ऐतिहासिक खंडा तलवार आणि खंडोबा देवाचे वीर लढवय्या रूप बघून आनंद व्यक्त करतात रशियातील बहुतांशी लोक खंडोबा हे शिवशंकर अवतार असल्याने खूप मनात असतात अशी माहिती तातीयांना कोचेतोवा या रशियातील उलान उदे शहरात वास्तव्य असलेल्या महिलेने दिली यावेळी ब्रात्सक सायबेरिया येथून आलेल्या एलविरा बुयानोवा व नातालीया तोलकाचोवा व मारीअण्णा यांनी खंडोबा मंदिरात सर्वाना सुखी ठेवणाऱ्या देवाचा जय जयकर असणारे गीत गायले काह्न्डोबाचा भंडारा उधळणे म्हणजे आपल्या परिवाराला अन्नद मागणे आहे तर खंडोबा देवाचे दर्शन घेणे म्हणजे साक्षात शिव शंकरला पूजा करण्या सारखे आहे खरच देवा तुझी सोन्याची जेजुरी आहे हा देशच देवभूमी आहे येथील संस्कार संस्कृती आम्हाला वेगळी अनुभूती देत असते असे मारीअण्णा आबनावे या खंडोबा भक्त महिलेने सांगितले येथील बेचाळीस वजनाची महा तलवार हि हातात घेउन त्यांनी वंदन केले या वेळी श्री मार्तंड देवसंस्थान विश्वस्त संदीप जगताप यांनी आपल्या विदेशी खंडोबा भक्तांचे स्वागत केले आणि त्यांचा शाल खंडोबा प्रतिमा देऊन सन्मान केला .विदेशी भाविकांना भावणारा आणि भारतातील सर्व जातीय लोकांचा हा देव आता विदेशी पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्र झाला असून जागतिक पातळीवर रशिया भारत कः सामजिक आर्थिक राजकीय मैत्रीच्या सलोख्य बरोबरच सांस्कृतिक व अध्यात्मिक सलोखा वाढत आहे हाच तर खरा सदाआनंदाचा येळकोट आहे

by vijaykumar harishchandre
HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.

Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or [email protected]

Russian tourist visited Jejuri Khandoba Temple

रशियात खंडोबाचा येळकोट ; जागतिक शांतता करिता रशियन महिलांची जेजुरी खंडोबा देवास प्रार्थना

#Russiantourist
#JejuriKhandoba
#RussianTouristatJejuriTemple

source

You may also like...

Leave a Reply